1स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
2हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
4जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
7होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.