2मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
3अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
4जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.
5ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
6परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
7तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.
8परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.