7जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.
8तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस.
9त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर.