Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:32-44

Help us?
Click on verse(s) to share them!
32मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
33हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
34मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
35तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
36माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
37निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
38तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
39ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
40पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
41हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
42जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
43तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
44मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:32-44स्तोत्र. 119:32-44