Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते - शास्ते 20

शास्ते 20:8-21

Help us?
Click on verse(s) to share them!
8सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, “आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही.
9परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू.
10आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातली दहा माणसे व हजारातून शंभर, व दहा हजारातून एक हजार, इतकी माणसे निवडू. ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.”
11मग इस्राएलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरुद्ध जमले.
12तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे?
13तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हांला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांना जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू.” परंतु बन्यामिनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.
14आणि बन्यामिनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध लढावयास आपल्या नगरांतून गिब्याजवळ जमा झाले.
15त्या दिवशी बन्यामिनी लोकांनी आपल्या नगरांतून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सव्वीस हजार सैन्य बरोबर घेतले; त्यामध्ये गिब्यात राहणाऱ्या त्या सातशे निवडक पुरुषांची भर घातली.
16त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.
17बन्यामिनी सोडून, एकंदर इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते.
18मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, “बन्यामिनी लोकांशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे?” परमेश्वर देवाने सांगितले, “यहूदाने पहिल्याने जावे.”
19इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली.
20मग इस्राएली सैन्य बन्यामिन्यांविरुद्ध लढायला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध गिबा या ठिकाणी लढाईची व्यूहरचना केली.
21तेव्हा बन्यामिनी सैन्याने गिब्यातून निघून आणि त्या दिवशी इस्राएली सैन्यातील बावीस हजार मनुष्यांना मारले.

Read शास्ते 20शास्ते 20
Compare शास्ते 20:8-21शास्ते 20:8-21