Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 24

यहो. 24:16-21

Help us?
Click on verse(s) to share them!
16तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, “परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही;
17कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांच्या दास्यातून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यामध्ये त्याने आमचे रक्षण केले,
18आणि देशात राहणाऱ्या अमोऱ्यांनासह सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू.”
19परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, “तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.
20जर तुम्ही परमेश्वरास सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.”
21तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.”

Read यहो. 24यहो. 24
Compare यहो. 24:16-21यहो. 24:16-21