7तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.
8सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे.
9जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती.
10सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.
11परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;”
12जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले?
13पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.