Text copied!
Bibles in Marathi

यश. 1:7-13 in Marathi

Help us?

यश. 1:7-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.
8 सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे.
9 जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती.
10 सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.
11 परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;”
12 जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले?
13 पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.
यश. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी