8एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.
9सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ:
10एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.
11अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.
12अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.
13रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.
14सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
15एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,
16कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
17एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
18एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
19हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते.
20त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
21दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.
22लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.
23शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
24सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.