Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 9

स्तोत्र. 9:6-14

Help us?
Click on verse(s) to share them!
6जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
7परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
8तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
9परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
10जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
11सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
13परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
14म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; सियोन कन्येच्या दाराजवळ मी तुझ्या तारणात हर्ष करीन.

Read स्तोत्र. 9स्तोत्र. 9
Compare स्तोत्र. 9:6-14स्तोत्र. 9:6-14