49हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
50हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
51हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
52परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.