Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 89

स्तोत्र. 89:25-35

Help us?
Click on verse(s) to share them!
25मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
26तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
27आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
28मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
29त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
30जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
31जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
32मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
33परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
34मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
35एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.

Read स्तोत्र. 89स्तोत्र. 89
Compare स्तोत्र. 89:25-35स्तोत्र. 89:25-35