2माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.
3हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.
4हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
5हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
6हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
7हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
8हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.