Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 83

स्तोत्र. 83:4-13

Help us?
Click on verse(s) to share them!
4ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
5त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
6ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
7गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
8अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
9तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
10ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.
11तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.

Read स्तोत्र. 83स्तोत्र. 83
Compare स्तोत्र. 83:4-13स्तोत्र. 83:4-13