9दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
10जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
11देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
12जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.
13त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.
14त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.
15त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.
16त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.