Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 78

स्तोत्र. 78:56-61

Help us?
Click on verse(s) to share them!
56तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.
58कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले.
59जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला, आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले.
60त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.
61त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.

Read स्तोत्र. 78स्तोत्र. 78
Compare स्तोत्र. 78:56-61स्तोत्र. 78:56-61