5जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले.
6त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.
7त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली; जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.
8ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू. त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.
9आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
10हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
11तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस? तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?
12तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.
13तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला; तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.
14तू लिव्याथानाचे मस्तक ठेचले; रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.
15तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले; तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.