2मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.
3मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
4हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.
5कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
6गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
7पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे.
8माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.