19तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;
20निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.
21त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली
22त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.
23त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
24तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
25त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.