9हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास; जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस.
10तुझे लोक त्यामध्ये राहिले; हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले.
11परमेश्वराने आज्ञा दिली, आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते.
12सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात, आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते.
13जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता, तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात.