19प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
20आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
21पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
22परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.