Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 68

स्तोत्र. 68:17-34

Help us?
Click on verse(s) to share them!
17देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत. जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे.
18तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.
19प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
20आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
21पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
22परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
23यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
24हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.
25गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.
26मंडळीत देवाचा धन्यवाद करा; जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
27तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
28तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
29यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.
30लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.
31मिसरमधून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील.
32अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, परमेश्वराची स्तुतिगीते गा.
33जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो.
34देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे वैभव आणि आकाशात त्याचे बल आहे.

Read स्तोत्र. 68स्तोत्र. 68
Compare स्तोत्र. 68:17-34स्तोत्र. 68:17-34