Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 55

स्तोत्र. 55:1-15

Help us?
Click on verse(s) to share them!
1मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
2देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे माझ्या संकटात मला विसावा नाही.
3माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
4माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.
6मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
7मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.
8वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
10दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
11दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
12कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
13परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
14एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
15मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे.

Read स्तोत्र. 55स्तोत्र. 55
Compare स्तोत्र. 55:1-15स्तोत्र. 55:1-15