6कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल.
7परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.
8देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)
9परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस.
10तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात.