Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 40

स्तोत्र. 40:2-8

Help us?
Click on verse(s) to share them!
2त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
3आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
4जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
5परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत.
6यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.
7म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.
8माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.

Read स्तोत्र. 40स्तोत्र. 40
Compare स्तोत्र. 40:2-8स्तोत्र. 40:2-8