1मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.
2त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
3आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
4जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
5परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत.
6यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.