24जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
25मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
26सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
27वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
28कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
29नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.