1न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
3त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
4कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
5देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
6परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.