Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 31

स्तोत्र. 31:2-8

Help us?
Click on verse(s) to share them!
2माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
3कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
4त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे.
5मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
6जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
7तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस.
8तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.

Read स्तोत्र. 31स्तोत्र. 31
Compare स्तोत्र. 31:2-8स्तोत्र. 31:2-8