1दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन.
2जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक.
3जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.
4त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.
5कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही.