1दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
2माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
3तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.