12खुप बैलांनी मला वेढले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे.
13जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे.
14मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.
15फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे.
16“कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.
17मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात.
18त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात.
19परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.
21सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.
22परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.