1प्रमुख गायकासाठी अय्येलेथ हाश्शहर (म्हणजे पहाटेची हरिणी) या रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?
2माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.
3तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.