2त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस. आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही.
3कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.
4त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.
5तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.
6कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.