1आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
2तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
3तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
4परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
5हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
6जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.