Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 135

स्तोत्र. 135:3-13

Help us?
Click on verse(s) to share them!
3परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
4कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
5परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
6परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
7तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
8त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
9हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.
10त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले,
11अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
12त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
13हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.

Read स्तोत्र. 135स्तोत्र. 135
Compare स्तोत्र. 135:3-13स्तोत्र. 135:3-13