2त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
3तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
4मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
5परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
6पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.