1दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
2हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
3हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
6यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.