46मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
47मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
48ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
49तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
50माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;
51गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.