Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 11

लेवी. 11:40-46

Help us?
Click on verse(s) to share them!
40कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
41“जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.
42जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
43कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका!
44कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
45मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
46प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्याच्याविषयी हे नियम आहेत.

Read लेवी. 11लेवी. 11
Compare लेवी. 11:40-46लेवी. 11:40-46