2परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल,
3परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.
4याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.
5धार्मिकता त्याचा कमरबंद असेल, आणि विश्वास त्याचा कमरवेष्टन होईल.
6लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.