8तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?
9कालनो कर्कमीशासारखे नाही काय? हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?
10मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.
11शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तींचे जसे मी केले, तसे मी यरूशलेम व त्यातील मूर्तींचे करणार नाही काय?”
12सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.
13कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे, व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.
14पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे, व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”