4बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही, कारण या सर्वामुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील.
5माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.
6मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे. मी त्यास लूट करण्यासाठी अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी आज्ञा करीन.
7परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत. पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे.
8तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?
9कालनो कर्कमीशासारखे नाही काय? हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?
10मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.