Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यश. - यश. 10

यश. 10:14-26

Help us?
Click on verse(s) to share them!
14पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे, व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”
15कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.
16म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील; आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.
17इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल; तो त्याचे काटेकूटे व काटेझुडपे एका दिवसात जाळून खाक करील.
18परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील; जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.
19रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.
20त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.
21याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.
22कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे
23कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
24म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.
25त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.
26मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल.

Read यश. 10यश. 10
Compare यश. 10:14-26यश. 10:14-26