Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 राजे - 2 राजे 15

2 राजे 15:9-12

Help us?
Click on verse(s) to share them!
9जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.
10मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट करून त्यास लोकांच्या समोर मारून ठार केले. आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला.
11जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
12अशा रीतीने परमेश्वराचे जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की, “तुझे वंशज चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील,” आणि तसेच झाले.

Read 2 राजे 152 राजे 15
Compare 2 राजे 15:9-122 राजे 15:9-12