Text copied!
Bibles in Marathi

2 राजे 15:9-12 in Marathi

Help us?

2 राजे 15:9-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.
10 मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट करून त्यास लोकांच्या समोर मारून ठार केले. आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला.
11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
12 अशा रीतीने परमेश्वराचे जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की, “तुझे वंशज चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील,” आणि तसेच झाले.
2 राजे 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी