3जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.
4तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.
5त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.
6म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे तिला वाट सापडणार नाही.