Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 15

लेवी. 15:2-15

Help us?
Click on verse(s) to share them!
2इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.
3त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
4स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
5जो कोणी त्याच्या बिछान्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
6स्त्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
7स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
8स्त्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
9स्त्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
10त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
11स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
12परंतु स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
13स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
14आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
15मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.

Read लेवी. 15लेवी. 15
Compare लेवी. 15:2-15लेवी. 15:2-15