Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 19

यहो. 19:24-35

Help us?
Click on verse(s) to share them!
24पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
25त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
26अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
27ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.
28तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.
29तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.
30उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;
31आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
32सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
33त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
34तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
35त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;

Read यहो. 19यहो. 19
Compare यहो. 19:24-35यहो. 19:24-35