Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 7

प्रेषि. 7:12-21

Help us?
Click on verse(s) to share them!
12तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.
13मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.
14तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले.
15ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले.
16त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले.
17मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले.
18योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले.
19हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.
20त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले.
21मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता, फारोच्या कन्येने त्यास घेउन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले.

Read प्रेषि. 7प्रेषि. 7
Compare प्रेषि. 7:12-21प्रेषि. 7:12-21